सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पाकिस्तानात शशि कपूरच्या आठवणीत कँडल मार्च

बॉलीवूड अभिनेते शशि कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. इंडस्ट्रीव्यतिरिक्त इतर नामी लोकांनीदेखील त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. तसेच पाकिस्तानातही त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.
 
शशि कपूर यांचे कुटुंब पाकिस्तान येथील पेशावर शहरात राहत होते. पेशावरच्या ओल्ड सिटी किस्सर खवानी बाजारात 1918 मध्ये निर्मित त्यांचे घर आहे. हे घर त्यांच्या आजोबाने बनवले होते. या घराच्या बाहेर शशि कपूरच्या आठवणीत कँडल मार्च काढण्यात आला आणि त्यांच्या चाहत्यांनी मेणबत्त्या जाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.