सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं

नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. मित्रमैत्रिणींना, सहकार्‍यांना भेटवस्तू देत अनेकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्टनेही इंडस्ट्रीतील तिच्या मि‍त्रमैत्रिणींना पर्यावरण जण्याचा संदेश देत अनोख्या भेटवस्तू पाठवल्या.
 
स्पॉटबॉय ई या वेबसाइटच्या वृत्तानुसार कतरिना कैफ, वरुण धवन, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करण जोहर यांना भेटवस्तू पाठवल्या. पण, यात ती सिद्धार्थ मल्होत्राला मात्र विसरली. त्यामुळे पुन्हा एकदा आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आला की काय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. 
 
आलियाने सर्वांना भेट म्हणून रोपटे दिले. या भेटवस्तूवर कोएक्झिस्ट असा मेसेज लिहिला होता. कोएक्झिस्ट ही भटक्या कुत्र्यांसंदर्भातील एक मोहीम असून आलिया या मोहिमेचा भाग आहे त्यामुळे नवा वर्षाच्या शुभेच्छा देत आपली मोहीम कलाकार मि‍त्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून‍ तिने हा मार्ग निवडला असावा. पण, इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना भेटवस्तू पाठवताना तिने सिद्धार्थला मात्र वगळले. त्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या आलिया- सिद्धार्थच्या ब्रेकअपलच्या चर्चा होत्या. त्यानंतर दिवाळी पार्टीत दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेलं.