शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 नोव्हेंबर 2017 (10:45 IST)

केसांना तेल लावलेले आवडत नाही प्रियांका चोप्राला

प्रियंका चोप्राला आपल्या व्यस्त वेळापत्रक आणि वेगवेगळ्या रोलच्या शुटिंगमुळे हेअरस्टाईल सारखी सारखी बदलायला लागते. तिला ब्लो ड्रॉवरचा वापरही सारखा सारखा करायला लागतो. मात्र केसांना तेल लावलेले तिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे युट्युब स्टार लिली सिंहने प्रियांकाला तेलाच्या ऐवजी नवीन हेअर ऑईल सुचवले. कोरड्या आणि ओल्या केसांसाठी एकाचवेळी हे हेअर ऑईल वापरले जाऊ शकते. त्यामुळे दरवेळी हेअर स्टाईल बदलण्याच्या वेळी केसांना तेल लावण्याच्या कटकटीपासून सुटका झाल्याचे प्रियांकाला वाटते आहे.
 
तेल आपल्या केसांना घनदाट आणि स्वच्छ राखतात, असे आपल्याकडच्या सर्व भारतीय मुलींना लहानपणापासून सांगितले, शिकवले जात असते. मात्र मला तर तेल लावले की खूप कटकटींचा सामना करावा, लागतो. एकतर सगळीकडे तेलकट तेलकट होते. दुसरे म्हणजे. त्या केसांना काहीही चिकटून राहते. मेकअपही नीट करता येत नाही. त्यामुळे केसांना तेल लावण्यापासून सुटका झाली, हे बरेच झाले, असे प्रियांका म्हणते. हॉलिवूडच्या चित्रपटांच्या शुटिंगच्यावेळी तर प्रियांकाला आपली हेअर स्टाईल खूपच बदलायला लागली होती. तेंव्हा तर तिने हेअर ट्रीटमेंटही केली होती. डोक्‍याला तेल लावून मसाज करण्यात खूप वेळ लागतो. त्यापेक्षा पर्यायी हेअर ऑईलने तात्पुरते का होईना हेअर स्टाईलसाठी केस अनुकूल करता येऊ शकतात, असे लिली म्हणाली.