बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेत्री प्रियंका चोप्रा नाराज

ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री पाठवण्यात आली आहे. मात्र न्यूटनच्या निवडीमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा नाराज झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेल्या प्रियंका चोप्राने गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी पुरस्काराच्या नामांकनामध्ये आपलं नाव असेल, अशी अपेक्षा तिला होती. 
 
व्हेंटिलेटर चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म फेस्टीव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यामुळे प्रियंका आणि मधू चोप्रांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ऑस्करसाठी भारतातर्फे प्रवेशिका निवडणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडे यावर्षी 26 चित्रपट पाठवण्यात आले होते. त्यामध्ये न्यूटन, व्हेंटिलेटर यासारख्या चित्रपटांचा समावेश होता.