1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Hindi-film-NEWTON-to-represent-India-to-Oscars-award.

‘न्यूटन’ करणार ऑस्करवारी

अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे.  परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘न्यूटन’ची निवड करण्यात आली आहे. राजकुमार राव या अभिनेत्याने ‘न्यूटन’मध्ये काम केले आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीने समितीने २६ चित्रपटांतून एकमताने ‘न्यूटन’च्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सी व्ही रेड्डी यांनी सांगितले. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. 

पुढील लेख
रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर रिलीज…(व्हिडिओ)