बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रजा-राखी... बनतील राम रहीम आणि हनीप्रीत!

बॉलीवूडची नजर तीक्ष्ण असते आणि करंट इश्यूवरून ते मसाला कसा तयार करायचा हे शोधूनच घेतात. हल्ली बलात्कार प्रकरणात कोठडीत असलेल्या राम रहीमवर खूप बातम्या सुरू आहेत. राम रहीमची अय्याशी बघून लोकांचे डोळे फाटले. त्याचं जीवन एवढं रंगीन होतं की त्यावर सिनेमा बनवण्याचं डोक्यात येणार नाही असे तर होऊच शकत नाही.
 
बातमी आहे की तयारी सुरू झाली आहे. रजा मुराद राम रहीमच्या भूमिकेत असणार तर त्याच्या जीवनात हनीप्रीतचे जागा भरून काढणार आहे राखी सावंत.
 
एजाज खानची भूमिका अश्या ऑफिसरची असणार जो राम रहीमची पोल सर्वांसमोर उघडकीस आणतो. निश्चितच हा सिनेमा मसालेदार असणार. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी तयारी सुरू असल्याची बातमी सूत्रांकडून प्राप्त होत आहे.