बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:25 IST)

बाबाच्या डेऱ्यात सापडले ६०० गाडलेले मृतदेह

शिक्षा भोगत असलेला बलत्कारी  बाबा  राम रहीम तर त्याचा डेरा सच्चा सौदाबद्दल दररोज एका नवीन खुलासा होत आहे. नवीन माहिती नुसार   डे-यात तब्बल  600 जणांपेक्षा आधिक लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस हादरले आहे. तर यामध्ये कितींना मारले गेले असावे यासाठी पोलिस तपास करत आहेत.डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपासना इंसा आणि डे-याचा उपाध्यक्ष डॉ. पीआर नॅन यांची हरियाणा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.डेरा जमिनीत, शेतात साधारण 600 पेक्षा जास्त लोकांची हाडे, सांगाडे पुरले आहेत असे या  डॉ. पीआर नॅन ने एसआयटीसमोर तसे स्विकारही केले आहे. त्यामुळे आता प्रशासन काय करते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

हे आरोप खोडत काही भक्त म्हणतात की ते सर्व भक्त होते त्यांना मोक्ष प्राप्ती साठी असे केले. मात्र अनेकांनी आता पोलिसांकडे येऊन जबाब नोंदवला आहे की जो बाबाला विरोध करत असे त्याला मारून येथे पुरले जात होते. त्यामुळे आता बाबाच्या अजून अडचणी वाढणार आहेत.

बाबा सध्या रोहतक येथे जेलमध्ये असून त्याला चांगलेच कामाला लावले आहे, दिवसभर अर्थात ८ तास काम केले तर त्याला २० रु मेहताना दिला जातो.