गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:17 IST)

‘पद्मावती’ चा फर्स्ट लूक रिलीज

भिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. राणी पद्मिनी अर्थात दीपिकाचा फर्स्ट लूक पद्मावती चित्रपटाच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. सिनेमा एक डिसेंबर 2017 रोजी सिनेमागृहांमध्ये झळकेल.