शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:28 IST)

जुही परमार आणि सचिन श्रॉफ घटस्फोट घेणार

टेलिव्हिजनमधील सेलिब्रिटी जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांनी आठ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर आता घटस्फोट घेणार आहे. गेल्या एक वर्षापासून हे दोघं वेगळे राहत असून, त्यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची काहीच चिन्हं नाहीत. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. जुहीने सचिनचे घर सोडल्यापासून मुलगी तिच्याचकडे राहतेय. 

लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सर्व ठीक होते. पण, जसजसा काळ लोटत गेला तसे त्यांच्यात छोटे-मोठे वाद होऊ लागले. त्यांच्यातील वाद आता सुटण्याच्या पलीकडे गेले आहेत.  दोघं जवळपास वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. जुही लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.