शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (14:50 IST)

प्रभासने दिले श्रद्धाला सरप्राईज

बाहूबलीच्या तुफान यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास आता ‘साहो’ या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘साहो’ मध्ये प्रभास सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. ‘साहो’ चित्रपटाचे हैदराबादमध्ये चित्रीकरण सुरू आहे. श्रद्धा कपूरनेही सेटवर येण्यास सुरूवात केली आहे. प्रभासने ‘साहो’च्या सेटवर श्रद्धासाठी खास लंच प्लॅन केला होता. यामध्ये अनेक तेलगू पदार्थांचा समावेश होता.
 
प्रभासने फक्त एक,दोन नव्हे तर तब्बल पंधरा पदार्थांची दावत दिली. श्रद्धाने या लंच प्लॅनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. शुटींगच्या व्यस्त कामातूनही श्रद्धा तिच्या फॅन्ससाठी काही खास फोटो सोशल मीडियामधून शेअर करते. ‘साहो’च्या चित्रीकरणादरम्यानही श्रद्धाने काही निवांत क्षण शेअर केले. ‘साहो’ हा अ‍ॅक्शनपट आहे. याचित्रपटासाठी प्रभास मेहनत करत आहे. या चित्रपटासाठीही तो काही अ‍ॅक्शन सिन्स करणार आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनसोबतच श्रद्धा आणि प्रभासची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.