बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:38 IST)

सलमानचा ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरव

अभिनेता सलमान खानला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष किथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की, सलमान खानचं कौतुक करताना वाज पुढे म्हणाले की, “सलमान खान हा लोकांसाठी आदर्श आहेच. शिवाय त्याच्या बीईंग ह्यूमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम सुरु आहे.”

पुरस्काराबद्दल सलमान म्हणाला की, “वास्तविक, यापूर्वी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण हा पुरस्कार स्विकारताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या वडिलांनीही अशा मोठ्या पुरस्कारांनी मला गौरवलं जाईल, अशी अपेक्षा केली नव्हती.”