बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: हैद्राबाद , शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:28 IST)

सायना नेहवालच्या घरी पोहोचली श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या भूमिकेसाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत असून, श्रद्धा सायनाच्या हैदराबाद येथील घरी पोहचली आहे. तिने सायनाबरोबरच तिच्या आई-वडिलांचीही भेट घेतली आहे. यावेळी श्रद्धाने सायनाच्या फॅमिलीसोबत लंच केले, तसेच सायनाचा घरातील वावर कसा असतो, याविषयीची माहिती ही श्रद्धाने जाणून घेतली.
 श्रद्धाचा आगामी ‘हसीना पारकर’ हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. सध्या श्रद्धा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती सायनाच्या बायोपिकसाठी बॅडमिंटनही शिकत आहे. सध्या श्रद्धा प्रचंड व्यस्त असलेली अभिनेत्री आहे. कारण प्रोजेक्टबरोबरच तिच्याकडे ‘बाहुबली’ प्रभास  याचा ‘साहो’ हा बिग बजेट प्रोजेक्टही आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला ती लवकरच सुरुवात करणार असून, चित्रपटात ती प्रभासची अभिनेत्री म्हणून काम करणार आहे.