बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2017 (13:11 IST)

बच्चन, आमीर, प्रियंकाला ऑस्कर मतदानाचे निमंत्रण

अमिताभ बच्चन, आमीर खान, प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या स्टार्सना ऑस्करचे निमंत्रण आले आहे. ऍकेडमीमध्ये सहभागी होऊन ऑस्करसाठी मतदान करण्यासाठी त्यांना हे निमंत्रण देण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे निमंत्रण ऐश्‍वर्या राय, गौतम घोष, बुद्धदेव दासगुप्ता ,सलमान खान, इरफान खान, दीपिका पदोकोन, मॉन्सून वेडिंगचे वेषभूषाकार अर्जुन भसिनलेखक सूनी तारपोरवाला अणि माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन या भारतीयांनाही देण्यात आलेले आहे. 19 वर्षे वयाची एली फॅनिंग ही सर्वात तरुण, तर 95 वर्षे वयाचे बेटी व्हाईट हे सर्वात जास्त वयाचे सदस्य आहेत. एकूण 57 देशांतील 774 जणांना ऍकेडमीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले असून त्यामध्ये 39 टक्के महिला आणि 30 टक्के श्‍वेतेतरांचा समावेश आहे. या नवीन सदस्यांना निमंत्रण देण्यात आम्हाला आनंद होत आहे, असे ऍकेडमीचे अध्यक्ष चेरील बूनी इसाक्‍स यांनी एका निवेदनात म्ह्टले आहे.