सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सर्वात जास्त पैसे कमविणार्‍या अभिनेत्रीत प्रियंका

फोर्ब्सने सर्वात जास्त पैसे कमाविणार्‍या जगातील अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यात भारतातील अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या नावाचा समावेश आहे. दुसर्‍यांदा या यादीत प्रियंका चोप्राचे नाव समाविष्ट झाले आहे.
 
फोर्ब्स ने दिलेल्या माहितीनुसार 1 जून 2016 ते 1 जून 2017 या दरम्यान प्रियंकाची एकूण कमाई ही दहा मिलियन डॉलर्स म्हणजे 65 कोटी 60 लाख रूपये होती. प्रियंका या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. जाहिरातीच्या माध्यमातून प्रियंकाच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.
 
कोलंबियन अभिनेत्री सोफिया वेरगार ही पहिल्या क्रमांकावर आहे. सहा वर्षापासून सोफिया ही प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात तिने 272 कोटी रूपये कमविले असल्याचे आढळले आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या मानधनाच्या बाबतीत सोफिया ही अभिनेत्री कैली कुको हिच्या मागे आहे. पण जाहिरातीतून मिळणार्‍या कमाईत सोफिया सर्वात पुढे आहे.