बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांका बनणार वकील

आतापर्यंत आपण करीना कपूर, रानी मुखर्जी, लारा दत्ता आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांसारख्या अभिनेत्रींना वकिलाच्या भूमिकेत रूपेरी पडद्यावर पाहिलेले आहेच, परंतू आता या लिस्टमध्ये आणखी एका नावाची भर पडणार आहे आणि ती म्हणजे प्रियांका चोप्रा हिची. प्रियांका आपल्या आगामी चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे. फरक इतकाच आहे की प्रियांकाची ही भूमिका कोणत्या बॉलीवूड चित्रपटात नव्हे तर हॉलीवूड चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
 
सूत्रांप्रमाणे हॉलीवूड चित्रपट बेवॉचमध्ये दिसून आल्यानंतर एक असा हॉलीवूड चित्रपट साइन केला आहे ज्यामध्ये ती वकिलाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. प्रियांकाच्या या भूमिकेविषयी फार काही खुलासा होऊ शकलेला नाही परंतू या चित्रपटाचे दिग्दर्शन बेवॉचचे दिग्दर्शक करणार आहेत. सध्या प्रियांका मुंबईत असून लवकरच ती एखाद्या बॉलीवूड चित्रपटाची घोषणा करेल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तसे पाहता प्रियांका संजय लीला भंसालींचा चित्रपट गुस्ताखियां करणार होती, परंतू आत ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे.