शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 (07:30 IST)

मल्हारी मार्तंड नवरात्र विशेष प्रसिद्ध खंडोबाचे मंदिरे दर्शन

khandoba temple
Maharashtra Tourism : खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. ते भगवान शिवाचे अवतार मानले जातात आणि विशेषतः धनगर, शेतकरी व भटक्या समाजांमध्ये पूजले जातात. महाराष्ट्रात खंडोबाच्या अनेक मंदिरे आहे. यासच काही प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरे ही पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांत आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरे
श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा पुणे
श्री क्षेत्र जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवताचे सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असून “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. श्री क्षेत्र जेजुरीला चंपाषष्ठीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच श्री क्षेत्र जेजुरी सोन्याची तलवार, हलदी-कुंकू, भंडारा फार प्रसिद्ध आहे.
 ALSO READ: मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी
श्री पाली खंडोबा सातारा  
धनगर समाजाची सर्वांत मोठी यात्रा ही मार्गशीर्ष अमावास्या ते पौर्णिमा दरम्यान भरते. तसेच पालखी सोहळा आणि घोड्यांची बाजार बुणगे येथे भरते.  

श्री शेगाव खंडोबा वाशिम
संत गजानन महाराजांच्या शेगावपासून १ किमी अंतरावर असलेले खंडोबाचे मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच खूप भाविक येथे दर्शनासाठी येतात.  

श्री नळदुर्ग खंडोबा धाराशिव  
नळदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे.हे अतिशय प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून अनेक भाविक दर्शनासाठी येतात.  

श्री माळेगाव खंडोबा नेवासा  
प्रवरा-गोदा संगमाजवळ खंडोबा मंदिर आहे. फार जुनी यात्रा येतेच भरते. तसेच खंडोबा-यमाईची मंदिरे जवळजवळ असून अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात.

श्री आडबस्ती बीड
बीड जिल्ह्यातील हे सर्वांत मोठे खंडोबा मंदिर असून येथे खूप मोठी यात्रा भरते. लाखोंच्या संख्येने भाविक मंदीरात दाखल होतात.  

श्री नांदूरमधमेश्वर खंडोबा नाशिक  
श्री नांदूरमधमेश्वर खंडोबा मंदिर हे गंगापूर धरणात बुडालेले मंदिर आहे. तसेच धरणाचे पाणी कमी झाल्यावर हे मंदिर दिसते. त्यावेळी लाखो भाविक दर्शनाला येतात.

श्री वडगाव रासाई खंडोबा पुणे
श्री वडगाव रासाई खंडोबा मंदिर हे देखील भीमा नदीत बुडालेले मंदिर आहे. तसेच पाणी कमी झाल्यावर येथे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

ही मंदिरे म्हणजे महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी सर्वांत जास्त ओळखली जाणारी व भाविकांची गर्दी होणारी ठिकाणे आहे. इतर अनेक गावखेड्यातही खंडोबा मंदिरे आहे, यात्रेच्या दृष्टीने” तुम्ही खंडोबाच्या मंदिरांना नक्कीच भेट देऊ शकतात.
प्रमुख उत्सव  
चंपाषष्ठी आणि नवरात्र हे मुख्य सण. जेजुरीला लाखो भाविक येतात.
खंडोबा हे घोड्यावर बसलेल्या योद्धा रूपात पूजले जातात.