गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमिताभला म्हणले, आमच्याकडे येऊ नका

हिंदी सिनेसृष्टीचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. आजच्या घडीला बॉलीवूडमध्ये खान कंपनीची चलती असताना देखील त्यांचे चाहते कमी नाहीत. ते आज जिथे जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. पण एक देश असाही आहे ज्या देशाचे नागरिक अमिताभ बच्चन यांना आमच्या देशात येऊ नका असे म्हणत आहेत.
 
या देशाचे नागरिक त्यांना असे का म्हणत आहेत ते जाणून घेऊया. त्याचे झाले असे की डब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालिदवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमिताभ डब्ल्यूएचओचे सदिच्छा दूत असल्यामुळे या कॉन्फरन्ससाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता असून अनेक पत्रकरांची हत्या होत आहे.
 
अनेक नेते कैदेत असल्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.