बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:22 IST)

नागराज मंजुळे अमिताभ बच्चन सोबत हिंदी सिनेमात

दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमात  बिग बी अमिताभ बच्चन दिसणार  आहे. नागराज मंजुळे यांनी नव्या कथानकावर काम सुरु केलं आहे. हे कथानक अगोदर मराठी होतं. मात्र ‘सैराट’नंतर नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करणार आहेत. नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केलं आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचं कथानक दाखवलं. अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला असून या वर्षाअखेरपर्यंत सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे.