मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शनिवार, 28 एप्रिल 2018 (15:41 IST)

प्रियांका ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. क्वांटिकोच्या सेटवर प्रियांकाला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. दुखापतीमुळे प्रियांकाला पुढील तीन आठवडे आराम करावा लागणार आहे, त्यामुळे तिला क्वांटिकोची शूटिंगही करता येणार नाही.
 
प्रियांका चोप्राने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘शूटिंगदरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मला सेटवर फिजिओलॉजिस्टला बोलवावं लागलं. पुढील तीन आठवडे माझ्या गुडघ्याला पट्टी बांधलेली असणार आहे. ’प्रियांकानं‘क्वांटिको’मध्ये अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारली आहे.