बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जुलै 2018 (16:02 IST)

पोर्न स्टार सनी लिओनीने ‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटावर वादाला सुरुवात

‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’  या वेबसिरीजचा शुक्रवारी ट्रेलर प्रदर्शित केला. यामध्ये बॉलिवूडची हॉट अभिनेत्री व पॉर्न स्टार सनी लिओनीने जीवनावर आधारित आहे असे सांगितले गेले. मात्र यात सनीचे मुल नाव उपयोगात आणल्याने सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होताच शीख धर्मियांनी त्यावर जोरदार विरोध दर्शवत आक्षेप घेतलाय. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ता दिलजीत सिंग या बायोपिकच्या नावात कौर शब्द वापरल्याने त्यावर आक्षेप घेतला असून, शब्दाला शीख धर्मात खूप मान आणि आदर आहे. तर तत्पूर्वी सनीनं वर्षापूर्वी तिच मूळ नाव बदलून सनी लिओनी हे नाव धारण केलं आहे,त्यामुळे तिने बायोपिकसाठी कौर ऐवजी लिओनी हेच आडनाव वापरावे अशी सक्त ताकीद सिंग यांनी दिल. कौर आडनाव वापरल्यास शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे तिच्यावर कारवाई केली जावी असंही सिंग म्हणाले आहेत त्यामुळे आता मोठ्या वादाला सुरुवात होणार आहे, अश्लिल चित्रपटात काम करत असल्याने सनीला आधीही विरोध झाला आहे. त्यामुळे हा विरोध किती तीव्र होते हे पाहावे लागणार आहे.