गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जुलै 2018 (08:32 IST)

नीरज पांडे यांच्या आगामी चित्रपटात अजय देवगण

दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा चाणक्यची भूमिका करणार आहे. याबाबत अजय देवगणनेच ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. हा चित्रपट हिंदुस्थानाच्या इतिहासातील अत्यंत विद्वान विचारवंतावर आधारीत असल्याचं अजयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटलंय की ‘मी या चित्रपटाबाबत बऱ्याच महिन्यापासून विचार करीत होतो. या चित्रपटात अजय देवगणची भूमिका सगळ्यांना आवडेल अशी मला खात्री आहे’अस म्हटल आहे. 
 
इसापूर्व चौथ्या शतकात चाणक्यची किर्ती फक्त हिंदुस्थानातच नाही तर सर्वदूर पसरली होती. साहसी योद्धा, शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार अशा विविध भूमिका चाणक्याने बजावल्या होत्या. राजा चंद्रगुप्त मौर्यच्या काळात चाणक्याला आदराचे स्थान होते, स्वत: चंद्रगुप्त मौर्य हा चाणक्याला गुरूस्थानी मानत होता.