1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (12:33 IST)

मिताली म्हणते, प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी

Mithali
सध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक लवकरच येणार आहे. मितलीनं स्वतः यासाठी हिरवा कंदील दाखवला असून या चित्रपटात देसी गर्ल प्रियांकानं आपली भूमिका साकारावी अशी इच्छाही तिनं बोलून दाखवली आहे. मिताली राजचं आत्मचरित्रही या वर्षात प्रकाशित होणार आहे. तर दुसरीकडे मिताली राजच्या बायोपिकचंही काम सुरू आहे. मिताली स्वतः चित्रपटाच्या कथानकाकडेजातीनं लक्ष घालत आहे. 'प्रियांका चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. तिच्यात आणि माझ्यात खूपच साम्य आहे त्यामुळे तिनं माझी भूमिका साकारली तर मला आवडेल. मात्र ही माझी इच्छा असून त्याबद्दल अंतिम  निर्णय चित्रपट निर्माते घेतील' असं मितालीनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटर्सवर आधारित 'सचिनः अ बिलिअन ड्रीम', 'अजहर', 'एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी' असे चित्रपट आले आहेत. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. पण महिला क्रिकेटपटूवर आधारित हा पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियांकानं या आधी बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे मितालीच्या इच्छेचा मान राखत प्रियांका चित्रपटात काम करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.