शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (12:38 IST)

वाँटेड 2 मध्ये दिसणार टायगर?

निर्माता बोनी कपूर यांना प्रदीर्घ काळापासून आपला 2009 चा हीट चित्रपट वाँटेडचा सिक्वल बनवण्याची इच्छा आहे, परंतु सलमानच्या होकाराच्या प्रतीक्षेत असाच वेळ निघून चालला आहे. त्यामुळेच आता बोनीजींनी सलमानची प्रतीक्षा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून सिक्वलच्या चर्चा सुरू आहेत. सलमान बोनी यांना जाणूनबुजून प्रतीक्षा करायला लावत असल्याचेही म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी रेस-3 च्या प्रमोशनदरम्यान सलमानने आपल्या आगामी चित्रपटांची नावे सांगितली होती. त्यामध्ये त्याने वाँटेड-2 चे नाव मात्र घेतले नव्हते, म्हणूनच की काय, बोनी कपूर यांनी आता सलमानची प्रतीक्षा न करता दुसर्‍या अभिनेत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे व हा शोध घेताना टायगरचे नाव समोर आले आहे. वाँटेड हा अ‍ॅक्शन चित्रपट होता व टायगर श्रॉफ हा आजचा सर्वात प्रतिभावान अ‍ॅक्शन स्टारच्या रूपात ओळखला जात आहे. अलीकडेच सलमानने स्वतः त्याचे कौतुक केले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, बोनी यांनी दिग्दर्शक प्रभुदेवाबरोबर मिळून चर्चा केली आहे व वाँटेडसाठी टायगरला घेता येईल, असेही त्यांनी सुचवले आहे. यासंदर्भात टायगरने बोनी कपूर व त्यांच्या टीमबरोबर चर्चा केली आहे.