सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (12:43 IST)

कृतीला करायचेय टायगरबरोबर काम

आपला पहिलाच चित्रपट हीरोपंतीद्वारेच टायगर श्रॉफने लोकांच्या मनामध्ये आपली जागा प्रस्थापित केली होती. बागी-2 च्या ऐतिहासिक यशानंतर टायगरच्या चाहत्यांची संख्या अचानक वाढली आहे. टायगरच्या याच लोकप्रियतेचा लाभ आता मोठे बॅनर घेऊ पाहत आहेत. हेच कारण आहे की, टायगर आता आदित्य चोप्रांच्या यश राज फिल्म्स व करण जौहरच्या बॅनर धर्मा प्रोडक्शन्सचे चित्रपट करत आहे. याशिवाय त्याच्याकडे रेम्बोचा रिमेकदेखील आहे ज्यामध्ये हॉलिवूड स्टार सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांची व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. टायगरबरोबर आता बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना चित्रपटकरण्याची इच्छा आहे. अलीकडेच एका हॉट अभिनेत्रीने आपण टायगरबरोबर चित्रपट करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे कृती सेनन. कृती व टायगरने आपले करिअर एकाच चित्रपटाद्वारे हिरोपंतीद्वारे सुरु केले होते व दोघांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थानही निर्माण केले. कृतीच्या म्हणण्यानुसार, टायगर हा अतिशय लाजाळू व साधा माणूस आहे. तो कधीच कुणाला त्रास देत नाही. त्याच्याबरोबर पहिला चित्रपट करताना खूप मजा आली, असेही कृतीने म्हटले आहे. टायगरची बागी मालिका ही खूपच हिट ठरली. पहिल्या बागीमध्ये त्याने श्रद्धा कपूरबरोबर काम केले, तर दुसर्‍या बागीध्ये तो दिशा पाटनीबरोबर दिसून आला. आता बागी-3 मध्ये टायगरबरोबर काम करण्याची इच्छा कृतीने व्यक्त केली आहे. तिला या चित्रपटात टायगरबरोबर अ‍ॅक्शनची धमाल करायची इच्छा आहे.