1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. salman and katrina in doom 4

सलमान-कतरिनाची जोडी आता 'धूम 4'मध्येही

salman
सलमान-कतरिनाची जोडी टायगर जिंदा है नंतर आता धूम 4 मध्येही दिसणार अशी चर्चा आहे. धूम 3 मध्ये आरि खानसोबत कतरिनाची जोडी होती, त्यामुळे धूमची सीरिज कतरिनासाठी काही नवी नाही. धूम 4 सलमान खान करणार हे ठरल्यावर त्याच्यासोबत कतरिनाच्या नावावर शिक्कामोर्तब होणे हे काही फार धक्कादायक नाही. कारण सलमानची कतरिना ही खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला आवडते. यशराजनेही त्यामुळे सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य यायचे ठरवले आहे. सलमान आणि कतरिना यांचा एकत्र असा हा सहावा चित्रपट आहे.
पुढील लेख
अनिल-जुहीची जोडी पुन्हा झळकणार