शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (11:31 IST)

सलमान या अभिनेत्रीमुळे आजही अविवाहित

काही दिवसांपूर्वीच सलमान खान रेस-3 च्या प्रमोशनसाठी महबूब स्टुडिओमध्ये पोहोचला तर त्याला भेटण्यासाठी तेथे कॅटरिनादेखील पोहोचली. पण कॅटरिनाला पाहताच सलानने असं काही केलं की ती हैराण झाली. सलमानने कॅटरिनाला विचारलं की, 15 जूनला एकीकडे रेस-3 रिलीज होणार आहे तर दुसरीकडे 29 जूनला तिचा एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा संजू सिनेमा रिलीज होणार आहे यावेळी तू कोणाला सपोर्ट करणार आहे. सलमानकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर कॅटरिनाच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. कॅटरिनाला या गोष्टीची कल्पना नव्हती की, सलमान आजही रणबीरचा विषय काढेल. ही गोष्ट तिला इतकी खटकली की ती लगेच तेथून निघून गेली. रणबीरबाबत कॅटरिनाला याआधीही सलमानने टोमणे दिले आहेत. कॅटरिनाच त्याला सोडून निघून गेली. त्यावेळी कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा सलमान म्हणायचा की त्याला या रिलेशनशिपबद्दल काहीच अडचण नाही. सलमान जेव्हा रणबीरबाबत कॅटरिनाला टोमणे मारतो तेव्हा ते आजूबाजूंच्या लोकांनादेखील लक्षात येतं. पण आता कॅटरिनाच्या लाइफ मधून रणबीर निघून गेला आहे आणि याला 2 वर्षे होत आली आहेत. कॅटरिना पुन्हा एकदा सलमानच्या जवळ आली आहे.