शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण

'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त सलमान खान प्रोडक्शन क्षेत्रामध्ये आहे. पण सिनेमाचा व्यवसाय पाहाता आता सलमान खानची कंपनी वितरण क्षेत्रामध्येही उतरणार आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचं प्रोडक्शन सलमान खानच्या कंपनीने सांभाळलं आहे. 
 
सलमान खान कंपनी 'रेस 3' या चित्रपटाच्या वितरणाचीदेखील जबाबदारी सांभाळणार आहे. सलीम खान या व्यवसायात लक्ष घालणार आहेत. सध्या सलमान खान 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. सलमान खान, जॅकलीन फर्नांडीस, अनिल कपूर, बॉबी देओल, सलीम साकिब, डेजी शहा अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं 'हिरिए' देखील रिलिज करण्यात आलं आहे. यामध्ये जॅकलिन आणि सलमान खान एकत्र थिरकले आहेत.