रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'भारत' सिनेमात अभिनेत्री दिशा पटानी

सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भुमिका असलेल्या 'भारत' सिनेमात अभिनेत्री दिशा पटानीची निवड करण्यात आली आहे. सलमानसोबत काम करण हे नव्या अभिनेत्रींच्या यशाच गणित मानल जात म्हणून दिशासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. एका भुमिकेसाठी दिशाची निवड करण्यात आलीए. तिच्याऐवजी श्रद्धा कपूरच नावदेखील चर्चेत होत. पण दोघींमधील कोणत नाव फायनल केलयं याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.  सलमानचा भारत सिनेमा हा मोठा प्रोजेक्ट मानला जातोय. 

यामध्ये भारत पाकिस्तान फाळणीची कहाणी असून भारताचा ७० वर्षांचा इतिहास असणार आहे. यासाठी दिग्दर्शक अली अब्बास बॉर्डरवर शुटींगसाठी योग्य लोकेशनच्या शोधात आहेत. अली अब्बास आणि सलमान यांच्या जोडीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी या जोडीन 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. २०१९ साली भारत रिलीज होणार आहे.