रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (15:05 IST)

काश्मीरच्या सोनमार्गमध्ये सलमान आणि जॅक्लीनचा हॉट अंदाज!

अभिनेत्री जॅक्लीन फर्नांडिस सध्या चित्रपट रेस 3साठी सोनमार्गमध्ये शूट करत आहे आणि अशात चित्रपटाच्या सेटवरून जॅकीने आपला आणि सलमानचा एक फोटो शेअर केला आहे.
 
या फोटोत सलमान खान काळ्या रंगाच्या सँडोमध्ये आपली बॉडी दाखवताना दिसत आहे तर दुसरीकडे सोनमार्गच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेटचा आधार घेत जॅक गरमा गरम कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.
 
सोशल मीडियावर फोटो अपलोड करत जॅक्लीन ने लिहिले,"Too hot to handle @beingsalmankhan #race3 #kashmir❤️@remodsouza @skfilmsofficial @tips".
सलमान आणि जॅक्लीनची हॉट जोड़ी सोनमार्गमध्ये रेस 3 साठी एक रोमँटिक गाण्याच्या शूटिंग करत आहे.
 
मागच्या वेळेस दोघांना हँगओवर गाण्यावर रोमांस करताना बघितले होते जो चार्टबस्टर हिट होता आणि आता ते रेस 3 च्या एका रोमँटिक ट्रॅकसोबत एकदा परत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.