बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

कठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी

जम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन या सुनावणीला सुरुवात होईल.
 
जानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.