1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:48 IST)

ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला

tajmahal

उत्तर प्रदेशात  झालेल्या  मुसळधार पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेशद्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही. ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री कोसळला. 

पावसाशी संबंधित अजून एका घटनेत आग्र्यापासून ५० किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात छत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला असून मथुरा जिल्ह्यात नांदगाव, वृंदावन आणि कोसी कालन परिसरात पिकं अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहेत.