शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 एप्रिल 2018 (08:04 IST)

अल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू

ल्जेरियाच्या बुफारिक विमानतळाजवळ अल्जेरिया सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमान दुर्घटनेत १००हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. विमान दक्षिण-पश्चिम अल्जेरियाहून बेछार येथे जात होतं सोशल मीडियावर या घटनेचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जात आहेत. यामध्ये दुर्घटनाग्रस्त विमानातून मोठ्या प्रमाणावर आग आणि धूर निघत असल्याचे दिसत आहे.