सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:22 IST)

पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार

विरोधकांच्या गोंधळामुळं नुकत्याच झालेल्या संसदेच्या सत्रात  कामकाज झालंच नाही. यात सर्वात आघाडी काँग्रेसनं घेतली होती. त्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा एक दिवसाचा उपवास करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आपल्या कार्यालयातच उपोषण करणार आहेत.  तर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटकातल्या हुबळीत उपवास करणार आहेत. भाजप देशभर हे आंदोलन करणार असून सर्व खासदार आपापल्या विभागात एका दिवसाचा उपवास करणार आहेत.