1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काँग्रेसकडून आज देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

national news
भाजपा सरकारमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी अर्थात आज  राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. मुंबईत सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ पक्षातर्फे सामूहिक उपवास कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.