1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इंजिनविना धावली १० किलोमीटर रेल्वे, घेऊनी २२ डबे अन प्रवासी

national news
ओदिशातील तितलागड रेल्वे स्थानकात रेल्वेचे २२ डबे प्रवाशांना घेऊन इंजिनविना तब्बल दहा किलोमीटर धावले. अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वेच्या दुसऱ्या बाजूला जोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रेल्वेचे डबे इंजिनविना स्थानकात उभे होते. पण, काळीवेळात हे डबे भरधाव पळायला लागले. 

या डब्यांनी वेग घेतला आणि ते कालाहांडी जिल्ह्य़ातील केसिंगाच्या दिशेने दहा किलोमीटर पुढे गेले. सदरच्या प्रकाराने हादरलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळांवर दगड रचून डब्यांचा विनाइंजिनचा प्रवास थांबवला. कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेमुळे संभाव्य अपघात टळला. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.