शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (10:55 IST)

जेटली त्यांच्यावर आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

अर्थमंत्री अरूण जेटली यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. शनिवार त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत आहे. त्यांनी स्वत:च याबाबत गुरूवारी ट्विट करून आपण मूत्रपिंड विकाराने त्रस्त असल्याचे सांगितले होते. निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. अपोलो रूग्णालयाचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. संदीप गुलेरिया हे जेटलींवर शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉ. संदीप हे एम्सचे संचालक आणि जेटलींचे निकटचे मित्र रणदीप गुलेरिया यांचे भाऊ आहेत.

दरम्यान, जेटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. मात्र  त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.