शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (14:38 IST)

ओलाकडून इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये  ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो. इन्शुरन्स प्रोग्रामसाठी कंपनीने एको जनरल इन्शुरन्स (Acko General Insurance) सोबत करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्या देशभरातील ११० हून अधिक शहरांत इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करणार आहे.

ओलाच्या या ऑफर अंतर्गत कंपनी १ रुपयात इन्शुरन्स उपलब्ध करुन देणार आहे. तर, ओला रेंटलसाठी हा चार्ज १० रुपये असणार आहे. ओला आऊट स्टेशनसाठी १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या इन्शुरन्स प्लान अंतर्गत जर तुमची लॅपटॉप बॅग, सामान, फ्लाईट सुटल्यास, अपघातात वैद्यकीय खर्च, रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सुविधा पुरवण्यात येणार आहे. ही इन्शुरन्स सुविधा ओलाच्या ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स कव्हर करणार आहे.

ओलाने आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स सोबतही करार केला आहे. या करारामुळे लवकरच नवी योजना सुरु केली जाण्याची शक्यता आहे. इन्शुरन्सची ही सुविधा मिळवण्यासाठी युजर्सला सर्वात आधी मेन्यूमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर प्रोफाईलमध्ये राईड इन्शुरन्सवर क्लिक करावं लागणार आहे. मग, तुम्हाला इन्शुरन्स बटन ऑन करायचं आहे. जोपर्यंत इन्शुरन्स बटन ऑन राहील तोपर्यंत चार्जेस सुरु राहणार आहे.