शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (10:53 IST)

घरगुती गॅसच्या किंमतीत कपात

अनुदानित आणि विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. यामध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 35.50 रुपये तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 1.74 रुपये इतकी कपात करण्यात आली आहे.सदरचे दर लागू झाले आहेत. 

इंडियन ऑईल कार्पोरेशनतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत दरानुसार,14.2 किलोचा विनाअनुदानीत गॅस सिलिंडर दिल्लीत 689 रुपयांऐवजी 653.50 रुपयांना मिळणार आहे. याचबरोबर या सिलिंडरसाठी कोलकातामध्ये 676 रुपये, मुंबईत 625 रुपये तर चेन्नईत 663.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 
 
अनुदानीत गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 1.74 रुपयांची किरकोळ कपात करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत 493 रुपयांना मिळणारा 14.2 किलोचा गॅस सिलिंडर आता 491.35 रुपयांना मिळणार आहे.