सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

टाटा स्कायचे वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध

टाटा स्कायने नवा प्लॅन सादर करत अवघ्या  ७५ रुपयांच्या महिन्याभराच्या पॅकमध्ये चांगली सेवा प्रदान केली जाईल. यासाठी युजर्संना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. हा कंटेंट फक्त मोठ्या स्क्रीनवर नाही तर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवरही उपलब्ध आहेत.
 
स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले की, टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या लॉन्चिंगसोबत सिनेमा, टेलिव्हीजन, हॉलिवूड नाही तर जगभरातील स्टोरीज जाहिरातमुक्त पाहायला मिळतील. यात ६५० तासांचा कंटेंट असेल. पहिल्यांदाच डीटीएच प्लेटफॉर्म जाहिरात मुक्त सेवा प्रदान करत आहे. हे २४ तास चालेल आणि अधिकतर शो असे असतील की भारतातील टी.व्ही. वर उपलब्ध नसतील.