मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 मार्च 2018 (10:20 IST)

एअर एशियाची दमदार ऑफर

एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी सुरुवातीला 1999 रुपये आणि देशांतर्गत प्रवासासाठी 849 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या ऑफरमध्ये 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग करताना येणार आहे.
 
या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरलाईनच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करावे लागणार आहे. तसेच, एअरलाईनच्या अॅपवरुन या ऑफरची बुकिंग करता येणार नाही. यामाध्यमातून देशांतर्गत बंगऴुरु, रांची, जयपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टनम, नागपूर, इंदोर, कोची, हैदराबाद पुणे, गुवाहाटी, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. तसेच, विदेशात कुआलालंपुर बँकॉक, मेलबर्न यासह अन्य काही ठिकाणी प्रवास करता येणार आहे.