भारत डेटा साक्षरतेमध्ये आघाडीवर
भारताचा विकास साधण्यात डेटा साक्षरतेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचा निष्कर्ष डेटा विश्लेषणातील क्लिक या आघाडीच्या कंपनीने केलेल्या आशिया—पॅसिफिक डेटा साक्षरता सर्वेक्षणातून अधोरेखित झाला आहे. व्यवसायाचे अधिक धोरणात्मक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संबंधित डेटाचा लाभ भारतीय व्यावसायिक कसा घेत आहेत याचे विवेचन या संशोधनात्मक सर्वेक्षणात करण्यात आले आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांचा कामावर डेटाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर असतो. ८५% कर्मचाऱ्यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी ते करत होते त्यापेक्षा आता ते अधिक प्रमाणात डेटाचा उपयोग करत आहेत आणि जवळजवळ चारपैकी तीन जण (७२%) आपल्या सध्याच्या नोकरीमध्ये आठवडय़ातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डेटा वापरतात. भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा आणि डेटा साक्षरतेचे महत्व मान्य करतात.
सर्वात जास्त डेटा साक्षरांसह भारत (४५% विरुद्ध क्षेत्रीय सरासरी २०%) आघाडीवर असून जपानमध्ये केवळ ६% कर्मचारी स्वत:ला डेटा साक्षर मानतात. भारत ६४%, ऑस्ट्रेलिया ३९% आणि सिंगापूर ३१% मधील सी-सूट आणि संचालक आपल्या डेटा साक्षरतेच्या पातळीबाबत अधिक आत्मविश्वास बाळगत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.