1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (09:09 IST)

आधार आणि पॅन कार्ड जोडणीची अंतिम मुदत ३० जून

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे. कर विभागाच्या धोरणं निश्चित करण्याऱ्या समितीने ही निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी दोन ओळखपत्रे एकमेकांना जोडण्यासाठीची शेवटची तारिख ही ३१ मार्च होती.

सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला आधारला विविध प्रकारच्या सेवांसोबत जोडण्याचा अंतिम दिवस ३१ मार्चच्या पुढे वाढवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. चौथ्यांदा सरकारने आधार-पॅन अंतिम मुदत वाढवली आहे. मात्र, सरकारने प्राप्तिकर जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पॅन कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे.