बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरचे अनोखे गुगल दुडल

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. पारंपारिक साडी परिधान केलेल्या वेशात  आणि नाकात नथ पले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे डिग्री प्रमाणपत्र दाखवतानाचे त्यांचे रेखाचित्र साकारले आहे.  त्यांना अभिवादन केले आहे. बंगळूरु येथील  रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी हे चित्र रेखाटले आहे. 
 
यानिमित्त गुगलने लिहीलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये माहिती देते आहे की,  एक तरुण महिला डॉक्टर  १८८६मध्ये  अमेरिकेहून भारतात परत आली.  त्यानंतर त्यांनी  कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिलांच्या वॉर्डसाठी फिजिशिअन/ डॉक्टर म्हणून कार्यभार स्विकारला होता. भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हे तर सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या १९व्या वर्षात वैद्यकीय पदवी त्यांनी घेतली होती. यांचे नाव  आनंदी गोपाळ जोशी असे होते . त्या धाडस आणि चिकाटीचे प्रतिक होत्या त्यामुळे त्याना अभिवादन करणे आणि प्रेरणा घेणे आपण सर्वांनी घर्जेचे आहे.