गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एअर इंडिया शेअर विक्री हा तर महाघोटाळा: स्वामी

business news
मुंबई :  भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी  ट्वीट केले असून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 

स्वामी म्हंतात की एअर  इंडिया सरकारी विमान कंपनीची प्रस्तावित विक्री ही आणखी एका महाघोटाळ्याची सुरुवात असणार आहे.  मी या संपूर्ण  प्रकरणावर लक्ष  ठेवून आहे. त्यामुळे  असं काही आढळून आल्यास कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे. त्यांनी  आपल्याच पक्षाला त्यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे.

एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले असून, सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी हे सागितले आहे.  सुयोग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे अंग काढून घेणार आहे असे मत्त असून  सरकार अनुकूल असल्याचं ते म्हणाले आहेत.