आरबीआय स्वतःच डिजीटल करन्सी जारी करणार
यापुढे कुणालाही ई-वॉलेट, नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत आदेश जारी केले आहेत. तर आरबीआयने स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे. बिटकॉईन खरेदीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले.
आरबीआयने एका समितीची नियुक्ती केली. ही समिती आरबीआयने स्वतःच डिजीटल करन्सी जारी करण्याबाबत सल्ला देणार आहे. आरबीआय जे डिजीटल नाणं जारी करणार आहे, त्यामुळे कागदी चलन छापण्याचा खर्च वाचणार आहे. मात्र ही व्हर्च्युअल करन्सी कधी येईल, याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही.