बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 एप्रिल 2018 (12:29 IST)

युनायटेड बॅंकची वर्ल्डलाईनशी हातमिळवणी

आताचे युग हे डिजियटायझेशनच्या वाटेवर प्रगती करत आहे. ऑनलाईन पेमेंट्स, खरेदी, विक्री, यासाठी अनेक ऍप्स व पेमेंट सिस्टिम उपलब्ध आहेत. ऑनलाईन पेमेंट व फीभरणा या महत्त्वाच्या व्यवहारांसाठी युनायटेड बॅंक ऑफ इंडिया व वर्ल्डलाईन यांनी युनायटेड ई कलेक्ट नावाचा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. वर्ल्डलाईन ही युरोपियन कंपनी पेमेंट व ऑनलाईन व्यवहारात कार्यरत आहे. युनायटेड बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पवन बजाज व वर्ल्डलाईनचे व्यवस्थापकीय संचालक दीपक चंदनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्लॅटफॉर्मची सुरूवात करण्यात आली. या प्लॅटफॉर्मचा ग्राहकांना ऑनलाईन बॅंकिंगच्या माध्यमातून तसेच समाजातील विविध विभागांसाठी उपयोगी ठरेल. युनायटेड ई कलेक्ट मुळे बॅंकांना सीएएसए व नॉन इंटरेस्ट इन्कम तसेच डिजिटली अबाधित राहण्यासाठी मदत करेल अशी आशा असल्याचे युनायटेड बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांना नेहमी सोयीस्कर, सुरक्षित व सोप्या पद्धतीच्या ऑनलाईन सेवा देणे हे वर्ल्डलाईनचे उद्दिष्ट आहे. डिजिटल बॅंकिंगच्या वाटेने अधिकाधिक प्रगती करण्यासाठी, तसेच ग्राहकांना डिजिटली उत्तम सुविधा देण्यासाठी युनायटेड बॅंकेला आम्ही मदत करत असल्याचे वर्ल्डलाईनचे व्यवस्थापकीय संचालक दीपक चंदनानी यांनी सांगितले.