सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (16:42 IST)

गाडीत गुदमरून भाजून चिमुकल्याचा मृत्यू

पुणे पिंपरी चिंचवड येथे दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. यामध्ये चाकणमध्ये परिसरात गाडीत गुदमरुन आणि उन्हाचे चटके बसल्याने पाच वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या लहानग्याच नाव करण पांडे असे आहे. करण हा दुपारी मित्रांनसोबत खेळत होता, दुपारी बाराच्या सुमारास उन्हात उभी असलेल्या इस्टिम गाडीत बसला. मात्र जसे गाडीचे दरवाजे लागले तसे गाडी अचानक लॉक झाली. तेव्हापासून तो अनेक तास तास गाडीत अडकला होता. बजाज ऑटो कंपनीच्या मोकळया जागेत ही कार दोन महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडली होती. भर दुपारचं ऊन आणि त्यात काचा बंद यामुळे त्याचा श्वास गुदमरला होता. उन्हाचे चटके तर असे बसले की मांडी आणि डोक्याचे कातडीही जळाली. संध्याकाळी पावणे सहा वाजता वडिलांना त्याचा मृतदेह गाडीत आढळला आहे. त्यामुळे लहान मुले खेळतांना पालकांचे पूर्ण जबाबदारी आहे की मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, हलगर्जी पणाचा बळी करण ठरला आहे.