सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (15:54 IST)

स्कूल व्हॅन चालकाचा अल्पवयीन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार

सिडको परिसरात संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणात स्कूल व्हॅन चालकानेच शाळेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पॉर्ण/अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी अंबड पोलिसांनी स्कूल व्हॅनचालक नराधम चालक किशोर देवकर (२१, रा़ बजरंगवाडी, पांडवलेणे) याच्या विरोधात विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या नराधमास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम संशयित किशोर स्कूल व्हॅनचालक सिडको परिसरातील मुलींना शाळेत सोडण्याचे काम करत होता. तर  त्याच्या व्हॅनमध्ये अनेक शाळांमधील मुली रोज प्रवास करत असतात. मात्र मागील गत सहा महिन्यांपासून तो सातवी व दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना गंगापूररोड परिसरात लपूनछपून काही कारणांनी घेऊन जात होता. या स्थळी नेवून तो व्हॅनमध्येच मुलींना मोबाइलवर अश्लील फोटो तसेच व्हिडीओ दाखवत असे, नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता़. मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार मुली पालकांना सांगण्यास घाबरत होत्या़ मात्र, त्यांनी पालकांना शंका आली आणि मुलीनी ही सर्व घटना त्यांना सागितली आहे.
 
पालकांनी नराधम देवकर याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ आहे. तर सिडको परिसरात दुसरा असाच प्रकार उघड झाला आहे. पैशाचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. संशयित नराधम विद्यासागर पाटील (३३, पाटीलनगर, सिडको) या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. सिडकोतील पाटीलनगर परिसरातील संशयित विद्यासागर पाटील (३३) याने एका पाचवर्षीय चिमुरडीस पैशाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.