गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 4 एप्रिल 2018 (13:11 IST)

शिवसेनेला भाजपाची‘मोठी’ऑफर

uddhav thakare
नाराज असलेल्या मित्रपक्षाची मनधरणी करण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. संसदेचे वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचे उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर पी जे कुरियन यांचा राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपल्याने लवकरच नव्या उपसभापतींची निवड होणार आहे. हे पद कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना देण्यासाठी भाजप तयार नाही. हे पद मित्रपक्षांपैकीच कोणालातरी मिळावे, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे.
 
दरम्यान, राज्यसभेत सध्या शिवसेनेचे तीन खासदार आहेत. संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे खासदार राज्यसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यांच्यामध्ये संजय राऊत सिनिअर असल्याने त्यांना उपसभापतीपद देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा आहे.