शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:32 IST)

भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट

एका कार्यक्रमात एक अभूतपूर्व योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून गळाभेट घेतली. त्यांच्या गळाभेटीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या दुरावलेल्या भावाबहिणींच्या भेटीनं राजकारणातली उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात कोणीही कधीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं याचं उत्तम उदाहरण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उभ्या महाराष्ट्राला दिलंय.

दरम्यान, पंकजा मुंडे सत्तेत मंत्रिपदी आहेत, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. दोघांकडेही राजकारणातील पदं आहेत. पण सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या दोघांना गळाभेट करताना पाहिलं की, रक्ताचं नात कधीही संपत नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.